शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दादांच्या मधुमेह, रक्तदाबाचा समतोल बिघडलाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:21 IST

कोल्हापूर : विधिमंडळात आमदार कपिल पाटील यांच्या अंगावर धावून जाणे, कोल्हापुरात शिक्षण बचाव समितीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करणे, पालक या नात्याने दाद मागायला येणाऱ्या लोकांना ‘पूर्वपरवानगी घेतली आहे का?’ असे विचारून त्यांची दखल न घेणे या प्रकारावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मधुमेह व रक्तदाबाचा समतोल बिघडलाय काय? असा प्रश्न पडल्याचा टोला ...

कोल्हापूर : विधिमंडळात आमदार कपिल पाटील यांच्या अंगावर धावून जाणे, कोल्हापुरात शिक्षण बचाव समितीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करणे, पालक या नात्याने दाद मागायला येणाऱ्या लोकांना ‘पूर्वपरवानगी घेतली आहे का?’ असे विचारून त्यांची दखल न घेणे या प्रकारावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मधुमेह व रक्तदाबाचा समतोल बिघडलाय काय? असा प्रश्न पडल्याचा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी सायंकाळी येथे लगावला. त्याचबरोबर भाजप सरकार हे सूडभावनेतून सीआयडी, सीबीआय, ईडीच्या माध्यमातून छापे टाकून कॉँग्रेसच्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.ताराबाई पार्क येथील राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या कार्यालयात २ व ३ एप्रिलच्या हल्लाबोल आंदोलनाच्या तयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.राज्याच्या अर्थमंत्र्यांनी १५ हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प जाहीर केला; परंतु हे तुटीचे पैसे कशातून भरून काढणार हा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस पालकमंत्री पाटील यांचा मधुमेह व रक्तदाबाचा समतोल बिघडल्याचे दिसत आहे. त्यांना सल्ला आहे की, त्यांनी जरा सबुरीने घ्यावे; तसेच त्यांचा मधुमेह व रक्तदाब संतुलित राहावा, अशा गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.ते पुढे म्हणाले, हल्लाबोल आंदोलनासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषद अध्यक्ष धनंजय मुंडे, माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, असे राष्टÑवादीचे नेते येणार आहेत. कोल्हापुरातील हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, तसेच सरकारवर नाराज असलेल्या कर्मचाºयांनाही निमंत्रित करावे. के. पी. पाटील म्हणाले, राष्टÑवादीचे हल्लाबोल आंदोलन यशस्वी करण्यासाठी व आमदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी करावी. मुश्रीफ हे फक्त कागलचे आमदार नसून जिल्ह्याचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा वाढदिवसाला जिल्हाभरात लावलेले फलक हल्लाबोल आंदोलनापर्यंत कायम ठेवावेत.ए. वाय. पाटील म्हणाले, चार वर्षांत भाजप सरकारच्या कारभाराने सर्व घटक नाराज आहेत. ते हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून मांडायचे आहे. यावेळी उपमहापौर सुनील पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, शहराध्यक्ष राजेश लाटकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव हजारे, माजी महापौर आर. के. पोवार, महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे, आदी उपस्थित होते.वाढदिवसासाठी खिशात हात घालावाजिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस प्रत्येक कार्यकर्त्याने स्वत:च्या खिशात हात घालून आपल्या परीने साजरा करावा, त्यासाठी वर्गणी गोळा करून गालबोट लावू नये, असे लाटकर यांनी सांगितले.हळदीच्या पडझडीची काळजी नाहीहळदी (ता. करवीर) येथे राष्टÑवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा रविवारी सायंकाळी भाजप प्रवेशाचा कार्यक्रम होता. हा धागा पकडत हळदीत काही पडझड झाली असली तरी त्याची काळजी करण्याची गरज नाही; कारण करवींर तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनासाठी येणार आहेत व आमदार मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडीची शर्यत आयोजित केल्याचे के. पी. पाटील यांनी सांगितले.जिल्हा बॅँकांच्या बरखास्तीची भाषाजिल्हा बॅँकांनी यापूर्वी सेवा संस्थांकडून व्याज वसूल केले आहे; परंतु सरकारकडून पुन्हा हे व्याज घ्यावे, असे जिल्हा बॅँकांना सांगितले आहे. हे शक्य नसल्याचे सांगायला गेल्यावर सरकारकडून बॅँका बरखास्तीची भाषा केली जात असल्याचे सांगून मुश्रीफ यांनी याबाबत न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचे सांगितले.